अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- जीवनात मित्रांची बरोबरी कोणीही करू शकत नाही . दोस्तीसाठी काहीपण…. अशा प्रेमळ मैत्रीच्या नात्याला धक्का देणारी घटना जिल्ह्यात घडली आहे.
आपल्या मित्राचा विश्वास संपादन करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम, मोबाईल असा 31 हजार रुपयांचा एकाने चोरून नेल्याची घटना घडली आहे.
दरम्यान याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. माऊली मच्छिंद्र बांदल (रा. हिरवळ ता. शिरोळ जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
राहुल रंगनाथ अल्लाट (वय 37 रा. पिंपळगाव उज्जैनी ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपळगाव उज्जैन गावामध्ये ही घटना घडली.
माऊली बांदल हा त्याचा मित्र राहुल अल्लाट यांच्याकडे राहत होता. तेथे राहत असताना त्याने राहुल यांच्या खिशातील रोख रक्कम,
मोबाईल, घड्याळ असा 31 हजारांचा ऐवज लंपास केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक दीपक गांगर्डे करीत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|