अहमदनगर Live24 टीम, 11 जुलै 2021 :- पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील आकाश काळे याचे तिन अज्ञातांनी अपहरण केले होते. मात्र पारनेर पोलिसांनी अत्यंत वेगावान तपास करत या युवकाची सुखरूप सुटका केली. तसेच अपहरणकर्ते देखील जेरबंद केले.
याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यामधील पिंपरी जलसेन येथील आकाश काळे या तरूणाचे इनोव्हा कारमधून आलेल्या अज्ञात तिघांनी अपहरण केले.
याबाबत पारनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक घनशाम बळप यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोकॉ सुरज कदम यांनी ग्रामसुरक्षा हेल्पलाईन नंबर 18002703600 यावर कॉल करुन घटनेची माहीती दिली.
त्यामुळे अल्पावधीत ग्रामसुरक्षा दलामध्ये सामाविष्ट असलेल्या सर्व सदस्यांना याबाबत फोनवरुन माहिती मिळाली. त्याचसोबत नागरिकांनीही या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ संशयीत ईनोव्हा कारचा पाठलाग करुन ती माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना कळवली.
त्यामुळे पोलिस पथकास अपहरणकर्त्यांची दिशा व लोकेशन सतत मिळाल्याने त्या दृष्टीने तात्काळ पथक रवाना करुन कारवाई करण्यात आली. दरम्यान अपहरण केलेल्या इनोव्हा कारचा पाठलाग करत असतांना अपहरणकर्त्यांनी अपहरण केलेला मुलगा आकाश काळे यास वडझिरे येथे सोडुन दिले
व आरोपी इनोव्हा कार घेवुन पुणेवाडी दिशेने जात असतांना पोलिस निरीक्षक बळप व पथक या इनोव्हाचा पाठलाग करत असतांना अपहरण कर्त्यांनी सदरची ईनोव्हा कार ही पुणेवाडी येथे सोडुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले.
या गुन्हयातील आरोपी सचिन बाबाजी बोरुडे, अशोक दत्तु बोरुडे,संग्राम चंद्रकांत कावरे, यांना अटक केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम