‘त्या’ निर्णयाचा आरोग्य कर्मचाऱ्यांनाच फटका! कर्मचाऱ्यांनी केले आंदोलन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा रुग्णालयातील (सिव्हिल) प्रशासनाने घेतलेल्या अडमुठ्या धोरणाचा फटका येथील आरोग्य कर्मचा-यांनाच या बसत आहे.

त्यामुळे संतप्त झालेल्या या कर्मचाऱ्यांनी आज सकाळीच रुग्णालयाच्या गेटवरच आंदोलन केले. सध्या सिव्हिलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी आहे.

त्यामुळे त्यांचे नातेवाईक व इतर नागरिक येत असल्याने हॉस्पिटलमध्ये व आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात होती.

या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयाच्या गेटच्या आत वाहने आनण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मोटारसायकल गेटच्या बाहेर रस्त्यावरच लावुन रुग्णालयात प्रवेश दिला जात आहे.

परंतु यामुळे येथील कर्मचाऱ्यांना देखील त्यांची वाहने बाहेर उभी करावी लागत आहेत. या दरम्यान अनेकांची वाहने चोरी जात आहेत.

अनेकांकडून दंड  देखील घेण्यात आला आहे. त्यामुळे या संतप्त कर्मचाऱ्यांनी याला जबाबदार कोण ? असा सवाल करत कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

आमच्या गाड्यांची सुरक्षा कोण घेणार असा सवाल करत कर्मचा-यांनी आपल्या गाड्या गेटच्या आत सुरक्षित राहातील व कर्मचा-याला वाहनासह गेटच्या आत प्रवेश मिळावा अशी मागणी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News