अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- रेखा जरे पाटील हत्याकांड प्रकरणातील सूत्रधार बाळ बाेठे हैदराबाद येथे असल्याची पक्की माहिती पाेलिसांना मिळाली होती. पण तेथील त्याचे लाेकेशन मिळत नव्हते.
तरी देखील त्याच्या अटकेसाठी गेलेली पथके हैदराबादमध्येच दबा धरून बसले हाेते. द रम्यान, इकडे बाळ बाेठेचा पंटर महेश तनपुरे याच्यावर पाेलिसांचा वाॅच हाेताच.
बाळ बाेठे याच्या कुटुंबात सर्वांचे माेबाइल नंबर शेवटी १४१४ आहेत. बाेठे याच्याप्रमाणेच तनपुरे याचे माेबाइल नंबर देखील १४१४ असेच होते. त्यामुळे पाेलिसांचा तनपुरे याच्यावरील संशय बळावला हाेता.
पाेलिस हेड काॅन्स्टेबल राजेंद्र वाघ व संजय खंडागळे हे दाेघे तनपुरे याच्यावर वाॅच ठेवून हाेते. फरार असताना बाळ बाेठे तनपुरे याच्या माेबाइलवर फाेन करत हाेता.
तनपुरे बाेठे याच्या घरी जायचा व बाेठेच्या कुटूंबाचे माेबाइलवरून बाेठेशी बाेलणे करून द्यायचा. शुक्रवारी बाेठेे याच्या मुलाचा वाढदिवस हाेता. यावेळी देखील तनपुरे याच्या माेबाइलवरूनच बाेठेचे कुटुंबाशी बाेलणे झाले.
बाेठे याचे पैसे संपले हाेते. त्याच्याकडे केवळ अडीच हजार रुपये शिल्लक हाेते. तनपुरे हा शनिवारी म्हणजे अटक हाेण्याच्या दुसऱ्या दिवशी बाेठे याला एक लाख रुपये पाठवणार हाेता.
मात्र, हेड काॅन्स्टेबल वाघ व खंडागळे यांनी त्यापूवीच तनपुरेच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर बाेठे याचे हैदराबाद येथील लाेकेशन देखील मिळाले आणि तेथे दबा धरून बसलेल्या पाेलिसांनी बाेठेला उचलले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|