अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- १६ लाख १३ हजार ७२० रुपयांचा अपहार करणारा सारोळे पठारचा (ता. संगमनेर) उपसरपंच प्रशांत फटांगरे याला रविवारी (ता. ११) रात्री घारगाव पोलिसांनी अटक केली.
त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सन २०१२-१३ ते २०१७-१८ या कालावधीत सरपंचपदावरील फटांगरे व ग्रामसेवक शेळके यांनी संगनमताने आर्थिक गैरव्यवहार व अपहार केल्याचा
अहवाल ३१ जुलै २०२० रोजी गटविकास अधिकाऱ्यांना सोपविला होता. याप्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील माळी यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये घारगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विद्यमान उपसरपंच फटांगरे व ग्रामसेवक शेळके
या दोघांच्या विरोधात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून हे दोघे पसार होते. पाच महिन्यांनंतर फटांगरे रविवारी रात्री दहा वाजता आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी गावात आला असता पोलिसांनी अटक केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम