अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- चितळी रेल्वे स्टेशन, जळगाव रेल्वे चौकी तसेच धनगरवाडी रेल्वे चौकीसह दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर ज्या ज्या ठिकाणी भुयारी पुलाची कामे पूर्ण झाली होती तेथे पावसाळ्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.
यातच आता राहाता तालुक्यातील जळगाव जवळील रेल्वे चौकीजवळ असलेल्या भुयारी पुलाखाली पाणी साचल्यामुळे या पुलाखालून जळगाव-गोंडेगाव यासह अनेक गावांसाठी जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
दरम्यान तालुक्यातील जळगाव चौकी येथील भुयारी पुलाचे काम दोन वर्षापूर्वीच सुरु झाले होते. मात्र पावसाळ्यात पुलाखाली पाणी जमा झाल्यास वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते. याचा अनुभव परिसरातील ग्रामस्थाना मागील दोन पावसाळ्यात आला होता. याबाबत ग्रामस्थांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या.
त्यानुसार रेल्वे खात्याने भुयारी पुलाखाली पावसाळयात जमा होणार्या पाण्याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना ठेकेदारांना दिल्या होत्या.
ठेकेदाराने फेबुवारीपासूनच काम सुरु केले होते मात्र अजूनही काम पूर्ण न झाल्यामुळे पहिल्याच पावसाळ्यात पुलाखाली पाणी जमा झाल्यामुळे या पुलाखालून परिसरातून जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.
सदर समस्या तातडीने सोडवण्यात यावी अशी मागणी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रामकृष्ण चव्हाण यांनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम