अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- अकोले तालुक्यातील मेहदूरी गावातील एका शेतकऱ्याने उसाच्या शेतात गांजाचे अंतरपीक घेतल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी बुधवारी त्या क्षेत्राचा शोध घेऊन छापा टाकून सुमारे ७५ किलो गांजा हस्तगत केला. यासंदर्भात मेहदूंरी येथे रोहिदास रामभाऊ पथवे बहिरवाडी,
याच्यावर अकोले पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल जबीर अन्वरअली सय्यद याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली.
गुप्त माहिती मिळाल्यानंतर संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्याचे पोलिस निरीक्षक अभय परमार, पोलिस नाईक मेंगाळ, कडलग, पोलिस कॉन्स्टेबल हांडे यांनी ही कारवाई केली.
या कारवाईत मेहदूंरी येथे रोडाजी उर्फ रोहिदास रामभाऊ पथवे यांचे शेतात गट नंबर ५५/२ मधून उसाचे शेतातून सुमारे ७ लाख ५० हजार रूपये किमतीची ७५ किलो वजनाचा गांजा पिकांची झाडे हस्तगत केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम