चोरीचा मुद्देमाल सापडला आरोपी मात्र मोकाट

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक महिनाभरापूर्वी बॅटऱ्या चोरी गेल्या होत्या. या बॅटरीची किंमत सुमारे २५ हजार रुपये एवढी होती. पाथर्डी पोलिसांनी या चोरीचा प्राधान्याने तपास करून या चोरी गेलेल्या बॅटऱ्या हस्तगत केल्या आहेत.

चोरी गेलेला मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात मिळाला असला, तरी या बॅटरी चोरणारे अज्ञात चोर मात्र अद्यापही मोकाट आहेत. त्यामुळे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असला तरी या चोरांचा शोध घेण्यासाठी देखील पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून तिसगाव येथे लहान मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या चोरांचा तपास होऊन संबंधित गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई होणे फार महत्त्वाचे आहे.

तिसगाव येथील आरोग्य केंद्रातून चोरी केलेल्या बॅटऱ्या डीवायएसपी सुदर्शन मुंढे व पाथर्डीचे पोलीस निरीक्षक जोंधळी यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलिसांनी तपास करून ताब्यात घेतले आहेत.

मात्र या गुन्ह्यातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. संबंधित आरोपी तिसगावसह परिसरातील असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News