पाच वर्षांपासून फरार असलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गेल्या पाच वर्षापासून पसार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केला.

अविनाश रामू बीडकर (वय 30 रा. भारस्कर कॉलनी, लालटाकी, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लालटाकी परिसरात सापळा लावून बीडकर याला अटक केली.

बीडकर विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, 23 नोव्हेंबर 2017 रोजी अविनाश बाळासाहेब शिरसाठ (रा. भगवान बाबा चौक, निर्मलनगर, सावेडी) यांना तिघांनी चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व शिरसाठ यांची दुचाकी लुटली होती.

शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात यापूर्वी दोघांना अटक केली आहे. बीडकर हा लालटाकी परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली.

त्यांनी तत्काळ पोलीस पथकाला पाठवून घटनास्थळावरून आरोपीला जेरबंद केले. पुढील तपासकामी बीडकर याला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe