प्रशासन दबावाखाली रेमडिसिवीर इंजेक्शनचे इंजेक्शनचे वाटप करीत आहे !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-अहमदनगर शहरासह जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.

या समस्येकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधत नगरला तातडीने ऑक्सिजन द्या, अशा मागणीचे पत्र शिवसेना युवा नेते विक्रम राठोड यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.

रेमडिसिवीर इंजेक्शनचे वाटप करताना राजकीय हस्तक्षेप होत असून प्रशासन दबावाखाली या इंजेक्शनचे वाटप करीत आहे, असा आरोपही शिवसेनेने केला.

नगर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती खूपच भयावह होत असून मृत्युचे प्रमाणही वाढत आहे. रुग्णांना वेळेवर बेड न मिळणे,

ऑक्सिजन संपणे, व्हेंटिलेटर उपलब्ध न होणे, रेमडिसिवीर इंजेक्शन वेळेवर न मिळणे ही त्यामागची मुख्य कारणे आहेत.

आरोग्य असुविधेंमुळे बळी जाता कामा नये यासाठी नगर शहर शिवसेनेने ९४२२२२१६०८ हा मोबाईल नंबर २४ तास सुरु ठेवला आहे.

वैद्यकीय मदतीसाठी नगरकरांनी या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन राठोड यांनी केले आहे.

नगर जिल्ह्यात कोरोना काळातील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ व महसुल मंत्री बाळासाहेब थोरात नगर दाैऱ्यावर आले होते. याप्रसंगी शिवसेनेने निवेदन दिले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe