अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-कठीण काळात एकमेकांशी समन्वय ठेवून मार्ग काढण्याची गरज असताना वैैद्यकीय क्षेत्र आणि प्रशासनात वादाच्या ठिणग्या झडण्याची चिन्हे आहेत.
ऑक्सीजनची व्यवस्था स्वत:च करा, असा सल्ला देणार्या जिल्हा प्रशासनाने ‘ऑक्सीजनअभावी रूग्णाचा मृत्यू झाल्यास प्रशासनच जबाबदार राहील’ असे स्पष्टपणे कळविले आहे.

file photo
पळपुटेपणा करू नका, जबाबदारी घ्या असाच अप्रत्यक्ष सल्ला दिल्याचे मानले जात आहे. खाजगी रुग्णालय यांनी त्यांच्या स्तरावर स्वत:च्या रुग्णालयासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करावे आणि ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट उभारणीबाबत तातडीने कार्यवाही करावी.
यामुळे त्यांच्या रुग्णालयाची ऑक्सिजनची गरज भागविणे शक्य होईल, असा सल्ला काल प्रशासनाकडून रूग्णालयांना देण्यात आला. त्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नगर शाखेने आक्षेप घेतला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|