अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यात बुधवारपर्यंत ४९१ ॲक्टिव्ह रुग्ण होते. त्यामध्ये गुरुवार दुपारपर्यंत ११४ रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या ६०५ झाली आहे.
४९१ रुग्णांपैकी मोहटादेवी येथील भक्त निवासात २०४, नवजीवन आश्रमशाळा माळी बाभूळगाव येथे १००, खासगी रुग्णालयात ४४, उपजिल्हा रुग्णालयात ४१ तर १०२ रुग्ण होम क्वारंटाइन आहेत.
पाथर्डी शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिक धास्तावले आहेत. सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर असल्याने यामध्ये आणखीनच भर पडली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून कोरोना लसीचा पहिला डोस मिळत नाही. त्यामुळे लसीकरण पुन्हा कधी सुरू होणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे.
बेजाबदारपणा कोरोना वाढीस कारणीभूत :- मिनी लॉकडाऊन असले तरी नागरिक भाजी बाजारात गर्दी करताना दिसत आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक तोंडाला मास्क लावत असले तरी शहरात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याचे दिसून येते.
प्रशासन या गोष्टीकडे डोळेझाक करीत आहे. शहरात भरणारा भाजी बाजार बंद केला असला तरी दररोज मोठ्या प्रमाणात बाजार भरत आहे.
त्या ठिकाणी काही विक्रेत्यांच्या तोंडाला मास्क नसते तर काही नागरिकही मास्क वापरीत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|