अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा नवा उच्चांक झाला आहे. शनिवारी दिवसभरात तब्बल 1 हजार 996 नवे करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
त्यामुळे आज अखेर जिल्ह्यातील बाधितांची संख्या एक लाख पार झाली आहे. दरम्यान काल दिवसभरात जिल्ह्यात 1 हजार 228 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

file photo
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 89 हजार 701 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 89.67 टक्के इतके झाले आहे.
उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 9 हजार 98 इतकी झाली आहे.
बरे झालेली रुग्णसंख्या : 89701
उपचार सुरू असलेले रुग्ण : 9098
मृत्यू : 1238
एकूण रुग्णसंख्या : 1,00,037
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|