कृषी पदविकाधारकाचे ऍडमिशनसाठी सुरु असलेले आंदोलन आश्वासनानंतर मागे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- बीएस्सी अ‍ॅग्रीसाठी प्रवेश द्या या मुख्य मागणीसाठी नेवासा तालुक्यातील कृषी पदविकाधारकांनी सोमवारपासून नेवासा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते.

मात्र एमसीएईआरच्या अधिकाऱ्यांनी कृषी पदविकाधारकांच्या कृषी पदविकेसाठीच्या प्रवेशाबाबत वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा होत असल्याचे आश्वासन दिल्यानंतर नेवासा तहसीलसमोरील सुरू असलेले उपोषण अखेर स्थगित करण्यात आले.

बीएस्सी ॲग्रीसाठी प्रवेश द्या, अन्यथा इच्छा मरणाला परवानगी द्या, अशी मागणी करत कृषी पदविकाधारक यज्ञेश नागोडे याने इतर मुलांसह तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू केले होते. तीन वर्षाच्या कृषी पदविकेनंतर बीएस्सी ॲग्रीच्या पदवीसाठी दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळत असे.

परंतु, या विद्यार्थ्यांच्या शेवटच्या बॅचला या सुविधेपासून वंचित ठेवण्यात आले होते. हा चुकीचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. राज्यातील दोन हजार विद्यार्थी यामुळे नैराश्यात आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. सलग ४६ तासांच्या उपोषणानंतर निवासी नायब तहसीलदार संजय परदेशी, नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड यांनी कृषी विद्यापीठातील अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा केली.

अधिकाऱ्यांनी प्रवेशाबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. कृषी पदविकाधारक यज्ञेश संजय नागोडे हा विद्यार्थी उपोषणाचे नेतृत्व करत होता. या उपोषणात मयूर जावळे, सचिन पेहरे, आदेश भोसले, साईनाथ चौघुले,

अभिजित शेळके, निलेश गाडेकर, अनिकेत औटी, आकाश शिंदे, प्रविण शिंदे, विकास काळे, राहुल बर्फे, अभय गणगे, रामेश्‍वर गणगे आदींनी सहभाग नोंदवला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe