अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- घोडेगाव उपाआवारातील नवीन कांदा मार्केटमधील गळ्यांच्या शुभारंभ प्रसंगी कृषी मंत्री दादाजी भुसे व मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी कांद्याचा लिलाव केला.
लिलाव केलेल्या कांद्याला सर्वोच्च 2400 रुपये प्रति 100 की भाव मिळाला. यावेळी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले कि, राज्यात सर्वाधिक कांदा आवक घोडेगाव येथे होते आहे.
ही बाब नेवाश्याचा दृष्टीने अभिनंदनीय असून योग्य व्यवस्थापनामुळे घोडेगाव कांदा मार्केट आज देशभरात प्रसिद्ध झाले आहे.
मंत्री भुसे पुढे म्हणाले की, राज्यात सर्वाधिक कांदा आवक घोडेगाव येथे होते आहे ही बाब नेवाश्याचा दृष्टीने अभिनंदनीय अशी आहे.
बेरोरजगार शेतकरी तरुणांना कांदा व्यापारी आडतदार करणारा उपक्रम कृषी क्षेत्रासाठी प्रेरणादायी व दिशादर्शक असा आहे.
यातून प्रेरणा घेऊन काम करू असेही भुसे म्हणाले. तसेच पुढे बोलताना भुसे म्हणाले, शंकरराव गडाख हे नेहमी नेवासा तालुक्यासह नगर जिल्ह्यातील शेतकरी प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी व विविध शेतीपूरक योजना राबवण्यासाठी मला भेटत असतात.
त्यांची सदैव त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी असते. घोडेगाव सारख्या ठिकाणी ना गडाख यांनी प्रयत्नपूर्वक सुरू केलेले कांदा मार्केट आज योग्य व्यवस्थापनामुळे देशभरात प्रसिद्ध झाले आहे.
तसेच ना शंकरराव गडाख यांनी विविध सहकारी व कृषीपूरक संस्थाची काळजीपूर्वक जपवणूक करत बेरोजगार तरुणांना व्यवसाय उपलब्ध करून दिला त्याबद्दल ना गडाखांचे त्यांनी कौतूक केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम