फळांच्या राजाचे आगमन, अश्या आहेत किंमती !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :-आडत बाजारामध्ये फळांचा राजा असलेल्या केशर, वनराज, बदाम हापूस आंब्याचे आगमन झाले.

महाराष्ट्र सब्जी सप्लायर्सचे प्रमुख अब्दुल्लभाई बागवान या आडत व्यापाऱ्याच्यामार्फत फळ विक्रेते व्यापाऱ्यांसाठी केशर १२० रुपये प्रतिकिलाे, बदाम ९०रुपये, हापूस १०० रुपये, वनराज ६० रुपये प्रतिकिलोच्या भावाने लिलावाद्वारे विकला गेला.

दोन दिवसांचा कडक लॉकडाऊन आहे. पहाटेच्या सुमारास आडत व्यापाऱ्यांकडे लिलावासाठी केशर, बदाम, हापूस, वनराज या जातीच्या आंब्याचे आगमन झाले.

या आंब्याच्या आगमनप्रसंगी महाराष्ट्र फ्रूट सप्लायर्स व साईबाबा फ्रूट सप्लायर्स या आडत व्यापाऱ्यांच्या मार्फत लिलाव सुरू झाल्यानंतर किरकोळ व्यापाऱ्यांसाठी बदाम हा ९० रुपये किलो, केशर १२० रुपये किलो,

वनराज ६० रुपये, तर हापूस १५० किलोप्रमाणे छोट्या फळविक्रेते व्यापाऱ्यांना विकला गेला. या सर्व आंब्याचा विक्रीचा शुभारंभ फळांचे ज्येष्ठ व्यापारी गफूरभाई बागवान यांच्या हस्ते कॅरेट फोडून करण्यात आला.

केशर, बदाम, हापूस, वनराज या आंब्याची आवक प्रथमच आमच्या आडत बाजारात झाली. सर्वसामान्यांना परवडेल, असे दर निघाल्याने या सर्व आंब्याचा घरी बसून आस्वाद घ्यावा, असे आवाहन तिसऱ्या पिढीपासून व्यवसायात सक्रिय फळांचे ज्येष्ठ व्यापारी गफूरभाई बागवान व युवा व्यापारी अब्दुल्लभाई बागवान यांनी केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News