महिला अधिकाऱ्याच्या आँडिओ क्लिपमुळे ‘त्या’ आमदाराच्या अडचणीत पडणार भर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :-  वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनअधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. यांचा संदर्भ देत आपल्याही मनात असाच विचार येत असल्याची नगर जिल्ह्यातील एका महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. या व्हायरल क्लिपमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणात एका लोकप्रिय लोकप्रतिनिधीचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. आत्महत्या केलेल्या वनअधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून देवरे यांनी पत्र लिहिलं आहे. मी लवकरच तुझ्या सोबत येत असल्याचे सांगत महिला म्हणून प्रशासनात कसा छळ होतो. लोकप्रतिनिधी कसा त्रास देतात.

आणि वरिष्ठ त्यांना कसे पाठिशी घालतात याचा उल्लेख त्यांनी केला आहे. नगर जिल्ह्यातील एका तालुक्यातील या वरिष्ठ महिला अधिकारी असल्याचे सांगितलं जात आहे. त्यांनी तालुक्यातील लोकप्रतिनिधींवर आरोप करताना काही घटनांची उदाहरणेही दिली आहेत.

कोवीड लसीकरणावरुन एका लोकप्रतिनिधींने एका आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. नंतर ती तक्रार मागे घेण्यात आली. याचा उल्लेखही संबंधित महिला अधिकारी यांनी नाव न घेता केला आहे. आपल्या विरुद्ध विधीमंडळात प्रश्न मांडणे, दमदाटी करणे, मी मारहाण केल्याची तक्रार माझ्या गाडीच्या चालकाकडून लिहून घेणं, अँट्रोसिटीची तक्रार दाखल करण्याची धमकी देणे असे अनेक प्रकार घडल्याचे महिला अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

आपल्या मुलांकडे पाहून आत्महत्या करण्याचे पाऊल उचलण्याचा विचार कधीकधी येतो. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्याने हे पाऊल उचल्याचे त्यांनी ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे. काय आहेत ऑडिओ क्लिपमध्ये जाणून घ्या त्यांनी म्हटले आहे, ‘दीपाली तू हे कृत्य केल्याचे मला तेव्हा आवडले नव्हते.

पण आता एकूण त्रास लक्षात घेता तुझ्याच पाठी यावे, असे वाटत आहे. महिला अधिकारी म्हणून लोकप्रतिनिधी त्रास देतात, प्रशासनातील वरिष्ठही हतबल असतात. लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या झुंडी सतत धावून येतात. त्यांना रोखता येत नाही आणि वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही.

त्यांनी तर खिंडीत मदत पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एका रथाची दोन चाके आहेत. मात्र, आपल्या चाकाने गती घेतली की घात झालाच समजा. कारण महिलांनी मागे राहणे हेच मनूने शिकविले. हे सगळे मनूचे अनुयायी आहेत. मग एकटीने वाट कशी चालायची?

दीडशहाणी, आगाऊ अशी विशेषणे लावली जाणार. जो पर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत आपल्याविरूद्ध उपोषण, मोर्चे, आंदोलने घडवून आणणार, असं या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe