अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- सोने तारण ठेवून नगर अर्बन बँकेकडून घेण्यात आलेल्या कर्जाची संबंधितांनी परतफेड केली नाही. त्यामुळे बँकने या सोन्याचा रितसर लिलाव ठेवला.
मात्र लिलावापूर्वी सोने तपासले असता पिशव्यांत सोन्याऐवजी बेन्टेक्सचे दागिने आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान ha धक्कादायक प्रकार नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत घडला आहे. शेवगाव शाखेत सोने तारण ठेवून कर्ज घेतलेल्या कर्जदारांनी परतफेड केली नाही. त्यामुळे त्या सोन्याचा लिलाव ठेवण्यात आला होता.
अशा ३६४ पिशव्या लिलावासाठी आणल्या होत्या. यावर संबंधित कर्जदारांनी कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतलेले आहे.
लिलाव प्रक्रिया सुरू होताच पिशव्या उघडून सोन्याची तपासणी करण्यात आली. त्यातील पहिल्या पाच पिशव्यांमध्ये नकली सोन्याचे दागिने असल्याचे आढळून आले.
त्यामुळे इतर दागिन्यांचीही अशी परिस्थिती असल्याचा संशय घेऊन लिलावात बोली लावण्यासाठी आलेले सराफ निघून गेले. यातून बँकेतील आणखी मोठा गैरव्यवहार उघडकीस येणार आहे.
बँकेकडून याचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या बँकेच्या पुण्यातील आणि नगरमधीलल काही शाखांमधील बोगस कर्जप्रकरणे यापूर्वीच उघड झाली असून काही प्रकरणांत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
त्यात आता आणखी कोट्यवधी रुपयांच्या कर्ज प्रकरणाची भर पडली आहे. यासंबंधी राजेंद्र गांधी यांनी सांगितले की, ‘शेवगाव शाखा बनावट सोनेतारण प्रकरणी २०१८ मध्येच गुन्हा दाखल होणे आवश्यक होते.
मात्र, त्यासाठी एवढी वर्षे टाळाटाळ करण्यात आली आहे. हा विलंब बँकेला, सभासदांना व ठेवीदारांच्या हिताला घातक ठरला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम