अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- विविध शहरांमध्ये बँका या 5 दिवस बंद असणार आहेत. यामध्ये आज 19 ऑगस्ट (मोहरम), 20 ऑगस्ट (ओणम), 21 ऑगस्ट थिरुवोणम असल्याने बँक बंद असणार आहेत.
तर 22 ऑगस्टला रविवार आहे. 23 ऑगस्टला संबंधित शहरात नारायण गुरु जयंतीमुळे बँक बंद असणार आहेत. अशाप्रकारे जोडून आलेल्या विविध सुट्ट्यांमुळे 5 दिवस बँक व्यवहार बंद असतील.
आज (19 ऑगस्ट) मोहरम आहे. त्यामुळे मुंबई, बेलापूर नागपूर, जयपूर, कानपूर, आगरताळा, अहमदाबाद, भोपाळ, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, नवी दिल्ली, पटना, रायपूर, रांची आणि श्रीनगरमधील बँका बंद आहेत.
तर 20 ऑगस्टला ओणम निमित्ताने बंगळुरु, चेन्नई, कोच्ची, तिरुवनंतपूरममध्ये बँक बंद असतील. तसेच 21 ऑगस्टला थिरुवोणम आणि 23 ऑगस्टला नारायण गुरु जयंती निमित्ताने कोच्ची आणि तिरुवनंतपूरमध्ये बँक व्यवहार होणार नाही.
देशातील विविध शहरांमध्ये 15 दिवस सुट्ट्या असल्याने बँका बंद राहतील. मात्र या सुट्ट्या सर्वच राज्यांना एकाच वेळी लागू होत नाहीत. संबंधित राज्यात एखाद्या महत्वाच्या दिवशी तेथील बँक बंद असेल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम