अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- घरगुती अडचणींचे कारण पुढे करत भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी तो मंजूर केला आहे.
कर्जत येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रसाद ढोकरीकर यांनी जिल्हा संघटन सरचिटणीस या पदावरून काम करण्यास घरगुती व वैयक्तिक अडचणीमुळे व आजारपणामुळे जिल्हाभर प्रवास करणे जमणार नाही.

त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, मला या पदावरून कार्यमुक्त करावे, तसेच माझा राजीनामा स्वीकारावा अशी विनंती ढोकरीकर यांनी केली होती.
त्यानुसार त्यांचा जिल्हा संघटक, सरचिटणीस नगर दक्षिण या पदाचा राजीनामा स्वीकारून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे, असे पत्र जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
आमदारांची जवळीक आणि राजीनामा… तर्कवितर्कांना उधाण ढोकरीकर यांनी त्यांच्या धाकोजी महाराज या विद्यालय मधील व्यायाम शाळेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. रोहित पवार यांच्या हस्ते केले होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर हा राजीनामा भाजपाकडून मंजूर करण्यात आला आहे का? अशी चर्चा सुरू आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













