अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील नितीन मोतीराम भालेराव या ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली असुन राहुरी पोलीसात अकस्मीक मृत्युची नोंद झाली आहे. नितीन भालेराव हा रोजंदारीवर मिळेल ते काम करत होता.
आज दिनांक २ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ५.३० ते ६ चे सुमारास प्रात :विधीच्या निमित्ताने राहुरी कृषी विद्यापीठाच्या इ विभागाच्या प्रक्षेत्रात गेला.
खुप उशीरापर्यंत नितीन परतला नाही म्हणुन त्याचा नऊ वर्षाचा मुलगा आर्यन हा त्याला पाहण्यासाठी गेला असता लिंबाबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला . ही बातमी गावात समजताच गावकरी व नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
ही घटना राहुरी पोलीसांना कळवताच पोलीस कर्मचारी संजय जाधव हे दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवून शवविच्छेदनास पाठविले.नितीन याच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजले नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम