नदीपात्रात बुडालेल्या त्या मुलाचा मृतदेह सापडला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- संगमनेर खुर्द येथील प्रवरानदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या पाच बालकांपैकी एकजण बुडाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत यश कृष्णा आडेप (वय 12, रा. पदमानगर) याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

प्रवरा नदीपात्रात वाहून गेलेल्या यश कृष्णा आडेप या पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह अखेर तब्बल चाळीस तासांनंतर आज सकाळी खराडीनजीक तरंगतांना आढळून आला.

स्थानिक गावकर्‍यांच्या मदतीने त्याला पाण्याबाहेर काढल्यानंतर कायदेशीर सोपस्कार उरकून शवविच्छेदनानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी त्याच्या नातेवाईकांसह मित्रमंडळींना शोक अनावर झाला होता. दरम्यान मंगळवारी सर्व मित्र पाण्यात पोहत होते. यातील यश आडेप हा अचानक पाण्यात बुडाला.

तो पाण्यात बुडाल्याचे समजताच इतर मुलांनी आरडाओरड केली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या ऋषिकेश रमेश मोहन याने यश याला वाचविण्याचा प्रयत्न केला.

प्रवरा पात्रात पाणी जास्त असल्याने यश हा वाहून गेला. नदीपात्रात मुलगा बुडाल्याची माहिती मिळताच अनेक नागरिकांसह पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.

रात्री उशिरापर्यंत यश याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र तो आढळून आला नाही. या घटनेला तब्बल ४० तासांचा कालावधी लोटल्यानंतर आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खराडीनजीक त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आला.

स्थानिकांनी तो पाण्यातून बाहेर काढला. त्याच दरम्यान त्याचे नातेवाईक व मित्र तेथे पोहोचले. याबाबतची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर कायदेशीर सोपस्कार उरकून यश आडेप या विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिकेच्या कुटीर रुग्णालयात आणण्यात आला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe