अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- दीड वर्षापूर्वी तालुक्यातील एका गावातून बेपत्ता झालेला १२ वर्षीय मुलगा वेल्लुपुरम (तामिळनाडू) येथे सापडला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात ६ फेब्रुवारी २०२० रोजी गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे सोपवला होता. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलिस हवालदार एस. बी. कांबळे यांनी त्याचा शोध घेतला.
तपासादरम्यान तत्कालीन निरीक्षक मसुद खान यांच्या सुचनेप्रमाणे राज्यातील विविध बालसुधारगृह, सामजिक संस्था यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा केला. बेपत्ता असलेला मुलगा वेल्लुपुरम येथील बाल कल्याण समितीत असल्याचे समोर आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम