अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- शेतीचे वाटणीपत्र करून त्या आधारे फेरफार नोंद करण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज केला असता तलाठ्याकडून लाचेची मागणी करण्यात आली.
मात्र तक्रारदाराच्या तक्रारीनंतर लाचखोर तलाठ्यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. होता. चंद्रकांत गजाबा बनसोडे (५६) असे आरोपी तलाठ्याचे नाव आहे.
त्याच्यासोबत असणारा त्याचा साथीदार खासगी सहायक अमित सर्जेराव शिर्के (वय ४०, रा. चांदा खुर्द, ता. कर्जत) हा फरार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, गुरव पिंपरी येथील शेतकऱ्याने त्यांच्या भावाच्या शेतीचे वाटणीपत्र करून त्या आधारे फेरफार नोंद करण्यासाठी गुरव पिंपरी येथील तलाठ्याकडे अर्ज केला होता.
ही नोंद करण्याच्या बदल्यात तलाठी बनसोडे व त्याच्या सहायकाने शेतकऱ्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे शेतकऱ्याने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्यानंतर तडजोडीअंती १२ हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, १० जून रोजी मिरजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही रक्कम स्वीकारण्याची तयारी तलाठ्याने दर्शवली.
त्यानुसार पथकाने सापळा लावून तलाठी बनसोडे यास १२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. तलाठ्याचा खासगी सहायक मात्र अद्याप फरार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम