अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- लग्नाबाबतचे सोशल मीडिया वर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहिल्यानंतर आपल्याला हसू आवरत नाही. लग्नात लोक मजा-मस्ती करत असतात. लग्नांचा माहोलच असा असतो.
भारतीय लग्नांमध्ये पारंपारिक विधींमध्ये देखील मजा येते प्रत्येक जण त्या एन्जॉयही करतो, पण अनेकदा या रुढीमध्ये असं काहीतरी घडतं ज्याचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यावेळी लग्नाशी संबंधित असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे.
जो पाहून प्रत्येकजण हैराण झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हा सर्वांनाच हसू येईल. हा व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरला आहे. व्हिडिओत स्टेजवर नवरा आणि नवरी उभे असून एक विधी सुरू आहे. ज्यात नवरी (Bride) नवऱ्याला आपल्या हाताने घास भरवते आहे.
पहा व्हिडीओ –
View this post on Instagram
जेव्हा हा विधी सुरू होता आणि नवरी नवऱ्याला घास भरवत असताना त्याने असं काही केलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. हा व्हिडिओ लोकांसाठी एक चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला गेला आहे.
व्हिडिओत तुम्ही पहात आहात की, नवरी आणि नवरदेवासोबत इतरही काही लोक उभे आहेत. असं वाटत आहे की येथे विधी सुरू आहेत. नवरीला एका मिठाईच्या प्लेटमधला एक तुकडा नवरदेवाला भरवायचा असतो पण तेव्हाच असं काही घडतं की, सर्वचजण हैराण होतात.
नवरी मिठाईचा तुकडा नवरदेवाला भरवायला जाते तेव्हा नवरदेव काही वेळ मिठाईचा तुकडा घेण्यास आढे-वेढे घेत आहे तेवढ्यात नवरी त्याला धीराने उत्तर देते आणि ती मिठाई नवरदेवाला भरवण्याऐवजी ती तेथेच फेकून देते. नवरीला एवढा राग येतो की विचारायची सोयच राहात नाही.
जवळच उभ्या असलेल्या नवरदेवाच्या चेहऱ्याचा रंगच फिका पडतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक जोरजोरात हसत आहेत. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम