अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- जिल्ह्यात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. यातच आता दिवसाढवळ्या देखील चोरीच्या घटना घडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकतेच कर्जत तालुक्यातील पाटेगावनजीकच्या वाघनळी येथे चोरट्यांनी सागर बबन पवार यांच्या घरावर डल्ला मारला आहे. या चोरट्याने घराचा दरवाजा तोडून कपाटातील सोने व इतर मुद्देमाल लंपास केला.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत मध्ये राहणारे पवार कुटुंबातील सर्व सदस्य शेतातील कामासाठी गेले होते. दुपारी जेवणाच्या वेळेस घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजाची कडी तोडलेली दिसली.
घरातील कपाटाचे लॉकर तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. पाहणी केली असता ऐवज लंपास झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पवार यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. कर्जत पोलीस पुढील तपास करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम