सिंगल चार्जमध्ये ही कार तीनशेहून अधिकचे अंतर सहज पार करणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- डिझेलच्या किंमती वाढत असताना जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे.

देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत.

त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, टाटा कंपनीची एक इलेक्ट्रिक कार अशी आहे,

जिला गेल्या काही वर्षांपासून भारतात मोठी मागणी आहे. सध्या तरी टाटाची ही इलेक्ट्रिक कार भारतीय इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये वर्चस्व गाजवतेय. TATA Nexon EV असं या कारचं नाव आहे.

या कारला भारतीय बाजारात चांगली पसंती मिळत आहे. एप्रिल 2021 मध्ये या कारने विक्रीच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड स्थापित केले आहेत.

जाणून घ्या कारची किंमत … टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक एसयूव्हीची एक्स शोरूम किंमत 13.99 लाख रुपये ते 16.25 लाख रुपयांपर्यंत आहे. ही कार XM, XZ+ आणि XZ + LUX अशा तीन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे.

नेक्सॉन ईव्हीच्या XM व्हेरियंटची किंमत 13.99 लाख रुपये आहे, तर XZ+ आणि XZ+ LUX व्हेरियंटची किंमत अनुक्रमे 15.25 लाख आणि 16.25 लाख रुपये आहे.

कारचे आकर्षक फीचर्स या इलेक्ट्रिक एसयूव्ही मध्ये दिलेलं इलेक्ट्रिक मोटर इंजिन 129PS पॉवर आणि 245Nm पीक टॉर्क जनरेट करतं. या कारमध्ये 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे.

एकदा फुल चार्ज झाल्यानंतर टाटा नेक्सॉन 312km पर्यंत धावू शकते. शून्य ते 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग घेण्यासाठी नेक्सॉनला 9.9 सेकंद लागतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe