अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- किरकोळ कारणातून मोठं मोठे वादाची ठिणगी पेटत असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. अशीच एका घटना श्रीरामपूर मध्ये घडली आहे.
यामध्ये मुलाला चापट मारल्याचा राग आल्याने एकाने महिलेचे बोटच फ्रॅक्चर केल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
फिर्यादी हिना नजीर बागवान, (वय 35 वर्षे,राहणार-बजरंग चौक, श्रीरामपूर) यांच्या मेव्हण्याच्या मिल्लतनगर येथील वडापावच्या टपरीवर एक लहान मुलगा आला व त्याने हातगाडीवरील वडीपाव उचलून घेवुन त्याच्या पॅंटच्या खिशात घातला.
याचा राग आल्याने फिर्यादीच्या मेव्हण्याने त्या मुलाला फटका मारला ही बाब संबंधित मुलाच्या घरच्याना समजली. त्या मुलाचे घरचे मुस्ताक बागवान,आसिफ बागवान,जबीन बागवान,दानिश बागवान यांनी फिर्यादी हिना बागवान यांच्या डाव्या हातावर पाईपने मारहाण केली.
त्यामध्ये हिना यांचे दोन बोट गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झालेले आहे. या घटनेवरून हिना बागवान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात वरील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम