OnePlus Nord CE 3 : कंपनीच्या आगामी बजेट स्मार्टफोनमध्ये असणार ‘ही’ अप्रतिम फीचर्स, किंमत असणार फक्त इतकीच…

Published on -

OnePlus Nord CE 3 : वनप्लस ही भारतातील दिग्ग्ज टेक कंपनी आहे. ग्राहकांच्या खिशाला परवडणारे स्मार्टफोन ही कंपनी सतत नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच आता ही कंपनी लवकरच त्यांची स्वस्त स्मार्टफोन सीरिज Nord CE चा विस्तार करणार आहे.

कंपनीचा लवकरच OnePlus Nord CE 3 हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. कंपनीचा आगामी स्मार्टफोन जुलैमध्ये लाँच करू शकतो असा दावा करण्यात येत आहे. परंतु, हा स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वी त्याचे तपशील समोर आले आहेत. जाणून घेऊयात सविस्तर..

जाणून घ्या OnePlus Nord CE 3 ची संभाव्य स्पेसिफिकेशन

My Smart Price च्या अहवालानुसार, OnePlus चा OnePlus Nord CE 3 हा स्मार्टफोन जुलैमध्ये लॉन्च होऊ शकतो. इतकेच नाही तर OnePlus Nord 3 देखील जून ते जुलै दरम्यान लॉन्च होऊ शकतो. टिपस्टरने आगामी फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल दावा केला आहे.

Tipster Steve Hemmerstoffer (@OnLeaks) च्या मतानुसार, कंपनीच्या OnePlus CE 3 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्लेसह येण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये 6.72 इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले मिळणार आहे. अगोदर याबाबत असे बोलले जात होते की कंपनीचा हा स्मार्टफोन IPS LCD स्क्रीन सह सादर केला जाणार आहे.

असा मिळू शकतो OnePlus Nord CE 3 मध्ये कॅमेरा

अहवालानुसार, OnePlus Nord CE 3 मध्ये octa-core Snapdragon 782G प्रोसेसर मिळू शकते. तसेच स्टोरेजचा विचार केला तर यात 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज असण्याची शक्यता आहे.आगामी फोनमध्ये तीन रियर कॅमेऱ्यांनी सुसज्ज असू शकते. या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा Sony IMX890 प्राथमिक सेन्सर, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स मिळू शकतो. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सेल सेन्सर मिळू शकतो.

अशी असू शकते फोनची बॅटरी

लीकनुसार, कंपनीच्या आगामी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी मिळू शकते. तसेच या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल-बँड वाय-फाय, 5जी, 4जी एलटीई, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट समर्थित असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News