अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आतच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये कोरोनाचा कहरच सुरु आहे.
यातच काल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्रीरामपूर तालुक्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. व या बैठकीत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या वेगवेगळ्या उत्तरांमुळे महसूलमंत्री नाराज झाले.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले कि, एप्रिल महिना हा खूपच धोक्याचा आहे. प्रत्येकाला झोकून देऊन काम करावे लागेल. तरच करोनाची साखळी तुटू शकेल. करोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी अनिल पवार, खा. सदाशिव लोखंडे, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहु कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके आदी उपस्थित होते.
या बैठकीत थोरात यांनी श्रीरामपूर तालुक्यातील करोना रुग्णांची सद्य स्थितीची आकडेवारी विचारली असता दोन अधिकार्यांकडे असलेल्या आकडेवारीत मोठी तफावत आढळून आली.
प्रांताधिकारी अनिल पवार यांनी तालुक्यातील करोना स्थितीचा आढावा वाचन करताना त्यांच्याकडून अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ४२८ वाचण्यात आली तर ना. थोरात यांनी आरोग्य अधिकार्यांना विचारले असता तालुका वैद्यकीय अधिकार्यांनी 692 असल्याचे सांगितले.
त्यावेळी ना. थोरात यांनी सांगितले की, दोनशे रुग्णांच्या आकड्यांची तफावत आहे, ही तफावत चिंता करण्यासारखी आहे. यावेळी जिल्हाधिकार्यांनी शहर व तालुका यांची स्वतंत्र वर्गवारी करण्यास सांगितले.
त्यावेळी ती वर्गवारीही करता आली नसल्यामुळे जिल्हाधिकार्यांनी शहर, तालुका व ग्रामीण वैद्यकीय अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. वैद्यकीय अधिकार्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रांताधिकार्यांकडे चुकीची आकडेवारी मांडण्यात आली.
यामुळे महसूलमंत्र्यांनी वैद्यकीय अधिकार्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत अशीच परिस्थिती राहिली तर तालुक्यातील करोना रुग्णांची परिस्थिती गंभीर होऊ शकेल.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्वि