अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवाणसांपासून लसीकरण मोहिमेचा अक्षरश फज्जा उडाला आहे. मनपाकडून यामध्ये सातत्याने गोंधळ निर्माण केला जातो आहे.
राजकीय दबावातून गुप्तरित्या काहींचे लसीकरण करण्यात आले असल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे .
महापालिकेच्या सावेडी उपनगरातील लसीकरण केंद्रांवर शुक्रवारी १८ ते ४४ वयोगटातील ७० नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
राजकीय दबावाखाली हे लसीकरण केल्याचे बोलले जात असून, मनपाच्या आरोग्य यंत्रणेवर कुणाचा दबाव आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
दरम्यान महापालिकेकडून ४५ ते ६० वयोगटातील ज्येष्ठांना कोविशिल्डचा दुसरा डोस दिला जात आहे. शहर व परिसरातील मनपाच्या सात आरोग्य केंद्रांवर ही लस दिली जाते.
प्रत्येक आराेग्य केंद्राला दररोज शंभर डोस वितरित होतात. हे डोस फक्त ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांना द्यावेत, असा आयुक्तांचा स्पष्ट आदेश आहे.
असे असताना काही आरोग्य केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांना डावलून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाही लस देण्याचे प्रकार सुरू आहेत.
सावेडी केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील चक्क ७० नागरिकांना लस दिली गेली. म्हणजे यादीतील ज्येष्ठ नागिरकांना डावलून ही लस दिली गेली.
दरम्यान ही लस कुणाच्या आशीर्वादाने दिली गेली. केंद्रावरील कर्मचाऱ्यांवर कुणी दबाव आणला, यासह अनेक प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम