अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.
मात्र वयोगटानुसार सुरु करण्यात आलेल्या या लसीकरणाचा अक्षरश फज्जा उडाला आहे.यातच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे.

कोरोनाविरोधातील लसीच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे तूर्तास लसीकरण केले जाणार नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी सांगितले की, लसीच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ या वयोगटातील नारगिकांचे लसीकरण तूर्त न करणााचा निर्णय सरकारने घेतला आहे.
दरम्यान केंद्र सरकारने १ मेपासून देशातील १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात करण्याची घोषणा केली होती.
दरम्यान, लसींच्या कमी पुरवठ्यामुळे आता राज्य सरकारने १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण तूर्तास रद्द केले आहे.
पहिला डोस घेणाऱ्यांना दुसरा डोस मिळणे आवश्यक सध्या ज्या व्यक्तींनी कोरोनाची लस घेतली आहेत त्यांना दुसरा डोस मिळणे आवश्यक आहे.
त्याचे कारण म्हणजे दुसरा डोस न घेतल्यात पहिल्यांदा घेतलेल्या लसीची उपयुक्तता राहणार नाही. त्यामुळे याआधीच कोरोनाविरोधातील लसीचा पहिला डोस घेतलेल्यांचे लसीकरण करणे गजरेचे आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|













