कंटेनरला मालवाहतूक पिकअपची धडक, तरुण जागीच ठार

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- संगमनेर तालुक्यातल्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगतच्या एका हाॅटेलसमोर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून मालवाहू पिकअपने जोराची धडक दिली.

या अपघातात पिकअपमधील एक जण जागीच ठार झाला. आज (दि. १०) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मालवाहू पिकअपवरील चालक हा पुणे येथून आळेफाटामार्गे संगमनेरच्या दिशेने जात होता.

हाॅटेलजवळ आला असता त्याच दरम्यान त्याठिकाणी उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून त्याची जोराची धडक बसली.

या अपघातात पिकअपमधील शशिकांत शिवाजी वाल्हेकर (वय २८ रा. डोणजे ता. हवेली, जि. पुणे) हा जागीच ठार झाला.

घारगांव पोलीस ठाण्याचे काॅन्सटेबल विशाल कर्पे यांच्यासह डोळासणे महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर क्रेनला बोलावून अपघातातील वाहन बाजूला घेण्यात आले. या अपघातात पिकअपचे मोठे नुकसान झाले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News