अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- संगमनेरात तीन दिवसात ४६२ रुग्ण आढळल्याने बाधित संख्येत झपाट्याने वाढ होऊन २८,७९५ झाली. शनिवार पर्यंत २७,२६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मृत्यूची संख्या मात्र समजू शकली नाही.
प्रशासन सर्व पातळीवर प्रयत्नशील असले तरी ग्रामीण भागात वाढता प्रादुर्भाव पाहता अलगीकरण कक्ष वाढविण्याची गरज भासत आहे. कोरोनाचा कहर नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे अंगलट येत आहे. अद्यापही निष्काळजीपणा होताना दिसतो आहे.
निर्बंध लादले असतानाही नियम धाब्यावर आहेत. प्रशासन हतबल झाले आहे. असेच चित्र राहिले तर परिस्थिती हाता बाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनावर ताण पडत आहे. नियमांचे पालन व नागरिकांचा प्रतिसाद प्रशासनाला अपेक्षित आहे. शहरातील बाधित संख्या शनिवारपर्यंत ५,५२१ असून ग्रामीण भागात २२८१२ तिपटीने झाली आहे.
कोरोना अद्याप संपला नसल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी. नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम