‘त्या’ निलंबित पोलीस निरीक्षकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- एका महिलेवर बलात्काराच्या गुन्ह्यात निलंबित असलेला पोलीस निरीक्षक विकास वाघ याला तोफखाना पोलिस पथकाने नाशिक येथून ताब्यात घेतले होते. वाघ विरोधात एका महिलेने अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

नुकतेच निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वाघ याच्याविरोधात कोतवाली पाेलीस ठाण्यात २९ सप्टेंबर २०२० रोजी नगर शहरातील एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता.

दाखल केलेला गुन्हा मागे घेत नसल्याने वाघ याने पीडित महिलेस पुन्हा मारहाण करत अत्याचार केला. याप्रकरणी २० फेब्रुवारी २०२१ रोजी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून वाघ याच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्यात पोलिसांनी वाघ याला १७ जून रोजी अटक केली होती. सध्या वाघ हा न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळून लावला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!