क्रिकेटचे मैदान देखील महिलांनी गाजवले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- नगर क्लबच्या मैदानावर सुरु असलेल्या पीपीएल क्रिकेट स्पर्धेत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा क्रिकेट सामना रंगला होता. पंजाबी सुपर क्वीन्स विरुध्द रॉकिंग ब्ल्यूस या महिलांच्या संघात झालेल्या सामन्यात पंजाबी सुपर क्वीन्स संघाने विजेतेपद पटकाविले.

उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत क्रिकेटचे मैदान देखील महिलांनी गाजवले. पंजाबी युथ ऑर्गनायझेशनच्या वतीने महिला दिनानिमित्त विशेष सामना खेळविण्यात आला. पंजाबी सुपर क्वीन्स कर्णधार नेहा देडगावकर-जग्गी तर रॉकिंग ब्ल्यूसच्या कर्णधार साक्षी कपूर या होत्या.

यामध्ये उत्कृष्ट फलंदाज जागृती ओबेरॉय, उत्कृष्ट गोलंदाज गीता नय्यर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण डॉ.सिमरन वधवा तर वुमन ऑफ दी मॅच नेहा देडगावकर-जग्गी ठरल्या. क्रेजी प्लेअरचा मान कशीश ओबेरॉय यांनी पटकाविला. या सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले काकाशेठ नय्यर, इंदरजीत नय्यर, प्रदीप पंजाबी, आगेश धुप्पड, जनक आहुजा यांच्या हस्ते विजेता संघ पंजाबी सुपर क्वीन्स व गुणवंत खेळाडूंना चषक व बक्षिसे देण्यात आली.

या स्पर्धेसाठी राजकमल ज्वेलर्स, युनिक डिटेलिंग मल्टी कार केअर सर्व्हिस, साई सुर्य ट्रेडर्स यांचे प्रायोजकत्व लाभले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सागर बक्षी, मोहित पंजाबी, हितेश ओबेरॉय, गौरव नय्यर, मनयोग माखिजा, प्रेती ओबेरॉय, बलजीत बिलरा, सावन छाब्रा, अनिश आहुजा, अभिमन्यू नय्यर, हर्ष बत्रा यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरजितसिंह वधवा यांनी केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe