विनापरवाना वाळूची चोरी करणारा ट्रॅक्टर गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- विनापरवाना वाळूची चोरी करणारा ट्रॅक्टर अहमदनगरच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पकडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

तसेच या तस्करांकडून दहा हजार रुपयांची वाळूसह पाच लाख १० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान हि कारवाई संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथे करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अमोल ज्ञानेश्वर गोदाडे रा. राजापूर, चिमा सूर्यवंशी रा. कासारा दुमाला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अमोल गोदाडे यास अटक करण्यात आली असून चिमा सूर्यवंशी हा फरार झाला आहे, अधिक तपास तपास विजय खाडे करीत आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक सचिन अडवल यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथे वाळूची चोरी होत असल्याची माहिती अहमदनगरच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe