सराईत गुन्हेगारास पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :-  नगर तालुक्यातील जखणगाव येथे दि.१६ जुलै रोजी रात्री घरफोडी करण्यात आली होती. त्यावेळी बंद घरातुन चार‌ शेळ्या चोरून नेल्या होत्या.

या चोरी बाबत नगर तालुक्यातील पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ३८९/२०२१ भा.द.वि,क,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल होता. याचा तपास सुरू असतानाच या विषयी मिळालेल्या गोपनीय माहिती वरून पोलिस अधीक्षक मनोज पाटील ,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,

उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील,नगर ग्रामीण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहा .पो. नि . राजेंद्र सानप नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस पथका सोबत कोंबिंग ऑपरेशन राबवुन देऊळगाव सिध्दी येथुन सराईत गुन्हेगार हर्षल काळे यास नगर तालुका पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

जखणगाव येथील शेळी चोरीतील आरोपीला अटक करून सदर गुन्हा उघडकीस आणला आहे. या सराईत गुन्हेगारवर नगर तालुका पोलिस स्टेशन येथे दोन गुन्हे तसेच श्रीगोंदा पोलिस स्टेशन येथे दोन गुन्हे आणि बेलवंडी पोलिस स्टेशन व दौंड पोलिस स्टेशन येथे प्रत्येकी एक एक गुन्हा दाखल आहे.

सदर आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या विषयी नगर तालुका पोलिस अधिक तपास करत आहे.

या कारवाईसाठी पोलिस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सहा . पो. नि .राजेंद्र सानप, पो. उप नि . धनराज जारवाला,सहा . ‌फौजदार लबडे, इथापे,

पो. हेड कॉ . धुमाळ,लगड, सरोदे, पोलिस नाईक योगेश ठाणगे, धर्मराज दहिफळे, पो. काॅ . जयदत्त बांगर,शाम घावटे, काळे, नगर तालुका पोलिस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी यांनी ही कामगिरी केली .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe