अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.
त्यांच्या या टीकेला महसूलमंत्र्यांची कन्या शरयू देशमुख यांनी उत्तर दिले आहे. पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होत, अशा शब्दांत शरयू देशमुख यांनी पडळकरांना टोला लगावला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘माझ्या हाती सत्ता द्या, ओबीसींना चार महिन्यांत पुन्हा आरक्षण मिळवून देईन, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन.’ असे वक्तव्य केले होते.
त्यावर टीका करताना महसूलमंत्री थोरात यांनी ‘फडणवीसांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. असे म्हंटले होते.
यावर आमदार पडळकर यांनी थोरातांना लक्ष्य केले होते.ते म्हणाले महसूल मंत्री’ पदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत…
मुळात देवेंद्र फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही.’
पडळकर यांच्या या ट्वीटला थोरातांच्या कन्या शरयू देशमुख यांनी ट्वीटद्वारेच उत्तर दिले आहे, त्यांनी म्हटले आहे की, ‘पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होतं.
आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!’ अशा भाषेत त्यांनी पडळकर यांच्यावर टीका करून त्यांना भाषा आणि संस्काराची आठवण करून दिली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम