‘त्या’ अपघातात तरुणाचा मृत्यू,परिसरात हळहळ व्यक्त…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-   भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने पुढे चाललेल्या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली.

या धडकेत मोटरसायकलवरील शैबाज कमरुद्दीन पठाण ( रा.तिसगाव, ता. पाथर्डी ) या युवकाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा येथे घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील शैबाज कमरुद्दीन पठाण हा तरुण दि.२२ फेब्रुवारी रोजी तिसगाव वरून श्रीरामपूरकडे जात होता.

तो राहुरी तालुक्यातील डिग्रसफाटा येथे दुपारच्या सुमारास आला असता पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्याच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.

या अपघातात शैबाज पठाण हा तरुण गंभीररित्या जखमी झाला. अपघातानंतर त्याला अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

परंतु तेथे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हुसेन रुस्तुम शेख यांनी राहुरी पोलिसात गुन्हा दाखल केला असून, राहुरी पोलिसांनी चारचाकी वाहन ताब्यात घेऊन  संबंधित वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अपघातात मृत्यू झालेल्या या तरुणाच्या निधनामुळे तिसगावमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe