रेशनवर मोफत धान्य देण्याचा निर्णय स्वागतार्ह !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-मागील मार्च महिन्यापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीपोटी हातावर पोट असणारे कष्टकरी नागरिक घराबाहेर पडत नव्हते.

त्यामुळे या नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी रेशन कार्डवर मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार रेशनकार्ड धारकांना मे व जून महिन्याचे प्रती माणसी ५ किलो धान्य रेशनवर मोफत देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

रेशनवर मोफत किंवा अल्पदरात अन्नधान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ५ एप्रिल रोजी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली होती.

राज्यात निर्माण झालेल्या कोरोना परिस्थितीचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री यांनी रेशन कार्डवर मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार रेशनकार्ड धारकांना मे व जून महिन्याचे प्रती माणसी ५ किलो धान्य रेशनवर मोफत देण्यात येणार आहे. यामध्ये रेशन कार्डवर प्रती माणसी ३ किलो गहू व २ किलो तांदूळ असे एकूण माणसी प्रती ५ किलो धान्य या दोन महिन्यात मोफत दिले जाणार अाहे.

मे महिन्याचे धान्य वाटप हे सोमवारी (२६ एप्रिल) पासून सुरू होणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली. सर्वसामान्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटून हातावर पोट असलेल्या

कुटुंबाना वेळेत अन्न धान्य मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकारने वेळीच दखल घेऊन रेशन कार्ड धारकांना मे व जून या दोन महिन्यांसाठी रेशन कार्डवर मोफत धान्य देण्याचा घेतलेला निर्णय दिलासा देणारा आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe