शेतीच्या वादातून पिता – पुत्रांमध्येच जुंपला वाद

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील बाप-लेकांनी तसेच महिलांनी शिवीगाळ करीत एकमेकांना मारहाण करीत जखमी केल्याची घटना घडली आहे.

दरम्यान ही धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे घडली आहे. या प्रकरणी कुटुंबांतील सदस्यांनी मंगळवारी (दि. ४) कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत.

यामध्ये दिनकर बच्चन निकम (वय ७० रा. निकम वस्ती, सुरेगाव ता. कोपरगाव) यांनी दिलीप दिनकर निकम, मोतीराम दिनकर निकम, सोन्याबाई दिनकर निकम, भूषण दिलीप निकम, कविता मोतीराम निकम, वैशाली दिलीप निकम ( सर्व रा. निकम वस्ती, सुरेगाव, ता. कोपरगाव) यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली

आहे. तसेच दिलीप दिनकर निकम (वय ४८, रा. निकम वस्ती, सुरेगाव, ता. कोपरगाव) यांनी रमेश दिनकर निकम, विलास दिनकर निकम, अजय रमेश निकम, शैलेश रमेश निकम, दिनकर बच्चन निकम,

सुनीता विलास निकम ( सर्व रा. निकम वस्ती, सुरेगाव ता. कोपरगाव) यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe