अर्बन बँकेच्या भवितव्यासाठी होणारी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध होणे अत्यावश्यक

अहमदनगर – नगर अर्बन बँकेची झालेल्या बिकट अवस्थेचा विचार करता बँकेच्या भवितव्यासाठी होणारी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध होणे अत्यावश्यक आहे.

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी अनेक दिवसापासून प्रयत्न करत आहे. असे प्रतिपादन वसंत लोढा यांनी केले आहे.

पुढे बोलताना लोढा म्हणाले कि, निवडणूक रिंगणात असलेल्या दोन्ही पॅनलच्या प्रमुखांशी व लोकप्रतिनिधीशी व उमेदरांशी चर्चा केली आहे मात्र अद्याप यश आलेले नाहीये.

जर निवडणूक झाली तर बँकेवर दीड ते दोन कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आधीच संकटात असलेली बँक अधिक अडचणीत येणार आहे.

बँकेच्या हिता साठी सर्वांनी समुपचाराने विचार करून अपासातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत ही निवडणूक बिनविरोध करावी. सर्वसामान्य सदस्यांशी चर्चा केली असता त्यांना ही निवडणूक नको आहे.

अर्ज मागे घेण्यास अजून दोन दिवस बाकी आहेत. जर निवडणूक बिनविरोध होत असले तर मी स्वतः पुढाकार घेत माझी पत्नी लता लोढा यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार आहे.

नगर अर्बन बँक ही सर्वसामान्य जनतेची कामधेनु आहे. त्यामुळे या बँकेला आपल्याला वाचवायचे आहे. आधीच तोट्यात असलेल्या बँकेला पुन्हा पूर्वीचे वैभवाचे दिवस आणायचे असल्याने दोन्ही पॅनलच्या प्रमुखांनी एकत्र येवून चर्चा करून दोन दिवसात निर्णय घ्यावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe