‘या’ व्यवसायावर झालेत लॉकडाऊनचे दूरगामी परिणाम ..!

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- दर दहा दिवसाला मिळणारे दुधाचे पेमेंट तसेच इतर वेळेत शेतीची कामे करता येतात, आदी कारणांमुळे दुधाच्या व्यवसायातून अनेकांना स्थैर्य प्राप्त झाले आहे.

शेतीचे कोणतेही पीक घेतले तर त्याचे लगेच पैसे मिळत नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांचा आठवडा बाजार, तसेच इतर दैनंदिन खर्च भागविणारा हा दूध धंदा आहे. हा विचार करून अनेक तरुण या व्यवसायात उतरले त्यासाठी मोठे कर्ज देखील घेतेले.

मात्र लॉकडाऊनमुळे सर्व चक्र थांबल्याने दूध व्यवसाय करणारे मोठ्या संकटात सापडले आहेत . शेतीला पुरक व्यवसाय म्हणून नगर जिल्ह्यातील अनेक शेतकरी शेतीला जोडून दूध व्यवसाय करतात. शेतकर्‍यांना देखील दूध धंद्याने मोठा आधार दिला आहे.

मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला अन राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनमुळे इतर व्यवसायासह दूध उत्पादनाला देखील मोठा फटका बसला आहे. जनावरांच्या अतिरिक्त खुराकवर त्याचा परिणाम झाला. महागडी खाद्य घेणे शेतकर्‍यांना परवडत नाही.

परिणामी दूध उत्पादन घटले आहे. त्यातच दुधाचे दर ३३ रुपयांवरून थेट २३ रुपयांवर खाली आले आहेत. परिणामी शेतकर्‍यांना लिटरमागे जवळपास १० रुपयांचा फटका बसत आहे. शासनाचे दूध दरावर नियंत्रण नाही. सध्या शासन आरोग्य यंत्रणेत जास्त गुंतले आहे.

याचे दूरगामी परिणाम दुग्ध व्यवसायावर होत आहेत. लॉकडाऊनमुळे सरकारने दूग्धजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणली आहे. ग्राहक कमी झाले आहेत, अनेक मोठी शहरे लॉकडाऊनमुळे पुर्णत: बंद आहेत. त्यामुळे खरेदीदाराच्या संख्येवर देखील परिणाम झाला आहे.

नगर जिल्ह्यात संगमनेर वगळता अन्यत्र कुठेही दुधापासून पावडर बनविण्याचा कारखाना नाही. परिणामी दुधाला फारसा उठाव नाही. एकंदरीत एका जनावरांसाठी लागणार चार,पशुखाद्य व इतर खर्च व शेतकऱ्यांना १ लिटर दुधाला मिळणारा दर पाहता मोठी तफावत आहे.

त्यामुळे आता यापुढे जर वेळीच दूध दर दिले नाही तर अनेकजण हा व्यवसाय बंद करण्याच्या मनस्थितीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe