शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज वाढवून देण्याच्या मागणीवर येत्या 15 दिवसात तोडगा निघणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Maharashtra News :- शेतकऱ्यांनी शेतीपंपासाठी दिवसात 10 तास विज वाढवून देण्याच्या मागणीवर निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेली काही दिवसापासून राजू शेट्टी आणि शेतकऱ्यांनी महावितरणाच्या विरोधात शेतीपंपाची वीज वाढवून मिळण्यासाठी आंदोलन केले होते.

त्याला आता यश मिळण्याची चिन्हे आहेत. आंदोलना दरम्यान ऊर्जामंत्र्यांच्या सोबत झालेल्या सकारात्मक बैठकीत. येत्या 15 दिवसात 10 तास वीज देण्याच्या अहवालावर तज्ञ समिती कडून अहवाल घेऊन याबाबत वीज नियमक आयोगाच्या मान्यतेने निर्णय घेणार असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितले.

तर या बैठकीत ऊर्जा मंत्री नितीन राऊत, राजू शेट्टी, विजय सिंघल, बंटी पाटील, राजू आवळे, राजेश पाटील अरुण लाड, ऋतुराज पाटील, सावकार मदननाईक, संदीप जगताप, प्रकाश पोकळे, जालंदर पाटील आणि वीज मंडळाचे अधिकारी हे देखील उपस्थित होते.

तसेच यावेळी महावितरणाला शेतीपंपास 10 तास वीज कशी देता येईल याबद्दल चर्चा झाली. तर ऊर्जामंत्री आणि अधिकाऱ्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे बैठकीच्या सुरुवातीला दहा तास वीज ही शेतकऱ्यांची हक्काची असल्याचे राजू शेट्टी यांनी बैठकीदरम्यान खडसावून सांगितले.

तर महावितरणाला विद्युत भाराच्या विभागणीत बळी घ्यायला सरकारला शेतकरीच दिसत आहे का? असा संतप्त सवाल शेट्टी यांनी केला. महावितरणाचा शेतकऱ्यांना वीज देण्यात असलेला भोंगळा कारभार.

तसेच शेतकऱ्यांकडून जास्तीचे बिल आकारणी. मीटर रिडींग घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या एजन्सी आणि कंपन्यांच्या कामचुकारपणामुळे याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला.

तसेच वीज बिलाच्या योजनेची मुदत ३१ मार्चला न संपवता ती आणखी १ वर्ष वाढवून देण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी उपस्थित केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe