अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-कोरोनाची बाधा झाल्याने रूग्णालयात उपचारादरम्यान पत्नी व मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच पित्याचा देखील मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावात घडली.
याबाबत सविस्तर असे की, पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील एका सुशिक्षित कुटुंबातील आई वडील व मुलगा हे तीन व्यक्ती अहमदनगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत होते.
यातील पती सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तर पत्नी मुख्याध्यापीका होत्या तर त्यांचा मुलगा हा देखील शिक्षक म्हणून कार्यरत होता. सध्या देशासह जिल्हाभरात कोरोनाने आपला विळखा अधिकच घट्ट केला आहे.
दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावात राहणाऱ्या या कुटुंबातील आईवडिल व मुलगा या तिघांना देखील कोरोनाची बाधा झाली होती.
त्यामुळे या तिघांवर नगर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र उपचारादरम्यान या तिघांपैकी आई व मुलाचा मृत्यू झाला. ही माहिती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पित्याला समजताच त्याने देखील रुग्णालयातच आपले प्राण सोडले.
या दुर्दैवी घटनेमुळे पाथर्डी तालुक्यातील करंजी गावावर मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात लहान दोन मुले, पत्नी, दोन बहिणी,असा परिवार आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|