अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- राज्यासह जिल्ह्यावर कोरोनाचे मोठे संकट कोसळले आहे. यामध्ये अनेक नागरिकांचं जीव जातो आहे. तर नागरिकांची जीव वाचविण्यासाठी प्रशासन देखील युद्ध पातळीवर कार्य करत आहे.
या सर्व गोष्टींसाठी प्रशासनाला मोठा आर्थिक भर देखील सहन करावा लागतो आहे. यातच आता जिल्हावासीयांसाठी महत्वाची व दिलासादायक माहिती समोर आली आहे.
करोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाययोजनांच्या दृष्टीने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून प्रथम हप्ता म्हणून सर्व विभागीय आयुक्तांना 176 कोटी 29 लाख 5 हजार रुपयांचा निधी अनेक जिल्ह्यांना वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
यात नगर जिल्ह्याच्या वाट्याला 10 कोटी 81 लाख 85 हजार रुपयांचा निधी आला आहे. या निधीमुळे करोना लढ्याला आणखी वेग येणार आहे.
या निधीतून आरटीपीसीआर किट्स आणि व्हीटीएम किट्स न्यूनतम दराने खरेदी करता येणार आहे. तसेच औषधे घेता येणार आहेत.
शासकीय, नगरपालिका, मनपा यांच्यासाठी लिक्वीड 02 टँक, ऑक्सिजन सिंलेडर, वैद्यकीय उपकरणे, साहित्य सामुग्री खरेदी करता येणार आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|