अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-शिवसेना नेते स्व अनिल राठोड यांचे नाव नगर शहरात होणार्या उड्डाणपुलास देण्याचा ठराव आगामी महासभेत घेवून तो मंजूर करावा अशी मागणी शिवसेना नगरसेवकांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती शिवसेना नेते संभाजी कदम यांनी दिली.
श्री कदम पुढे म्हणाले की, स्व.अनिल राठोड यांनी नगर शहराचे 25 वर्षे आमदार म्हणून शहराच्या जडण-घडणीत मोठे योगदान दिले आहे. दिर्घकाळ आमदार असतांना त्यांनी शहर विकासास हातभार लावला आहे.
नगरपालिका व त्यानंतर झालेल्या महानगरपालिकेच्या विविध अडचणी त्यांनी मंत्रालयस्तरावर तसेच वरिष्ठ पातळीवरुन सोडविल्या. त्याचबरोबर प्रत्येकवेळी मनपासाठी विशेष निधी मिळविण्यातही त्यांचा पुढाकार असत.
शहराचे लाडके नेतृत्व म्हणून त्यांचा गौरव होतो. अशा सर्वसामान्यांशी नाळ जोडली गेलेल्या स्व.अनिल राठोड यांच्या कार्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्ती करण्यासाठी शहरात होणार्या उड्डाण पुलास ‘स्व.अनिल राठोड’ यांचे नाव देण्यात यावे, असेही ते म्हणाले.
याबाबत संभाजी कदम यांनी यापुर्वी दि.6/8/2020 रोजी मनपा आयुक्त, महापौर, मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, जिल्हाधिकारी, उपअभियंता राज्य महामार्गा,
अधिक्षक अभियंता, प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग यांनाही पत्र देण्यात आलेले आहे. देवून ही मागणी केलेली आहे. याबाबत महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत ठराव घेऊन तो संबंधितांना पाठविण्यात यावा. याबाबत शिवसेनेसह सर्वपक्षिय नेते, पदाधिकारीही अनुकूल आहेत.
तसेच नुकतेच नगर विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे नगर दौर्यावर आले असता त्यांनाही याबाबत कल्पना दिली, त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत मनपाचा ठराव करुन द्यावा, असेही संभाजी कदम यांनी म्हटले आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved