शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपातून ‘या’ माजी मंत्र्याला मिळाली क्लीन चिट

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- माजी मंत्री संजय राठोड यांना शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपां प्रकरणी क्लीन चिट देण्यात आली आहे. पोलिसांना पाठवण्यात आलेल्या अर्जामध्ये महिलेच्या पतीचे नाव चुकलेले आहे.

संजय राठोड यांच्याविरुद्ध अशी कोणतीही तक्रार नाही, असं यवतमाळ पोलिसांनी सांगितलं आहे. ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नही…..’ असं ट्वीट संजय राठोड यांनी केलं आहे. विशेष म्हणजे सीबीआय चौकशीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही हेच वाक्य ट्वीट करत प्रतिक्रिया दिली होती.

राजकीय हेतू पोटी मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम सुरु असल्याचा आरोप देशमुख यांनी त्यावेळी केला होता. याप्रकरणी यवतमाळचे पोलीस अधीक्षकांचे स्पष्टीकरण विशेष चौकशी पथकाने केलेल्या चौकशीअंती माजी मंत्री आणि शिवसेना आमदार संजय दुलीचंद राठोड यांच्याविरुद्ध करण्यात आलेला तक्रार अर्ज महिलेने स्वतः पाठवलेला नाही.

या अर्जामध्ये महिलेच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. अर्जावरील सही त्या महिलेची नाही. महिलेच्या पतीचे नावसुद्धा चुकीचे टाकलेले आहे. त्यामुळे महिलेच्या नावाने पाठवलेला अर्ज खोटा आहे. महिलेची आमदार संजय दुलीचंद राठोड यांच्याविषयी काही तक्रार नाही.

नमूद महिलेच्या नावाने कुणीतरी खोडसाळपणे स्पीड पोस्टाने हा तक्रार अर्ज केल्याचे निष्पन्न झालेले आहे. अर्जात नमूद केलेल्या महिलेचा आणि महिलेच्या कुटुंबाचा तक्रार अर्जाशी काहीही संबंध नाही, असे यवतमाळचे एसपी दिलीप पाटील यांनी सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News