अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- श्रीरामपूर ते बेलापूर रस्त्याच्या चौपदरीकरण कामाच्या निविदा मागविण्यात आल्या असून त्या येत्या 30 मार्च रोजी उघडल्या जाणार आहेत. त्यानंतर 15 एप्रिलपासून प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.
दरम्यान या रस्त्याच्या कडेला असलेल्या श्रीरामपूर येथील वेशीपासून बेलापूर (कोल्हार चौक) पर्यंतच्या सुमारे 300 अतिक्रमण धारकांना गेल्या पंधरा दिवसांपूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

या नोटिसा मिळाल्यानंतर काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र काही जण पुढील कारवाईची वाट पाहत आहे त्याच ठिकाणी आपले व्यावसाय करीत आहेत.
ज्यांनी आतापर्यंत अतिक्रमण काढले नाही आहे अशाना आता दुसरी नोटीस बजावण्यात येणार आहे. ही नोटीस बजावताना अतिक्रमण धारकांना रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजुने 15 मिटरचे अंतर निश्चित करण्यात आले आहे.
तसेच आता 30 मार्च 2021 रोजी निविदा उघडल्यानंतर दि. 1 एप्रिल 2021 रोजी तिसरी (अंतीम) नोटीस बजावून त्यानंतर उर्वरित अतिक्रमण तात्काळ हटवून 15 एप्रिल 2021 पासून प्रत्यक्ष रस्त्याच्या कामास सुरुवात होणार आहे.
त्यामुळे अतिक्रमण धारकांनी शासनाच्या कारवाईची वाट न पाहता स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|